Belagavi

केएलई डेंटल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्पर्धेत यश

Share

पुणे येथील आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज येथे नुकतेच पार पडलेल्या राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा महोत्सवात बेळगावच्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यानी उत्कृष्ट कामगिरी बजावत विविध पुरस्कार आणि पदके जिंकून कॉलेजचा तसेच बेळगावचा गौरव वाढविला आहे.

बार लिफ्टिंग स्पर्धेत सिमरन मदली हिने प्रथम पारितोषिक पटकावले तर विद्यालयाच्या फुटबॉल संघाने बाजी मारली. रात्रीच्या फुटबॉल सामन्यात त्यांनी कांस्यपदक मिळवले.
धैर्य पवार, कौशिक जोशी, सिद्धेश मोकल, नील बॅरेटो, वॉन डिसोझा, तनय मिश्रा, ऑस्ट्रोश, सवेंद्र फुर्तादो यांनी ही कामगिरी केली आहे. प्राचार्या डॉ. अलका काळे, क्रीडा अध्यक्ष डॉ. सागर जालिहाळ यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले.

Tags: