उत्तर कर्नाटकातील लोकांनी माझे सर्व चित्रपट डोक्यावर घेतले आहेत, त्यामुळे या भागातील लोकांच्या प्रेमाबद्दल मी सदैव ऋणी आहे असे प्रसिद्ध कन्नड चित्रपट अभिनेते सतीश निनासम यांनी सांगितले.


बेळगावात आज पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आपल्या आगामी ‘अशोक ब्लेड’ या चित्रपटाविषयी माहिती दिली. सुमारे 70 दशके जुन्या कथेवर आधारित हा चित्रपट असून तो 90% पूर्ण झाला आहे. रचितराम पार्वती प्रॉडक्शनचा हा मॅटनी चित्रपट येत्या 2 महिन्यांत प्रदर्शित होईल.
मी उत्तर कर्नाटकासाठीच्या म्हादईसह अनेक मोठ्या आंदोलनात आणि कार्यक्रमात भाग घेतला आहे. मी या भागावर एक चांगला चित्रपट बनवणार आहे. माझ्या चित्रपटांना लोकांनी नेहमीच उचलून धरले आहे. “लुसिया” माझ्या आयुष्यात सर्वांत जास्त गाजलेला चित्रपट ठरला आहे. जेव्हा कन्नडिगांनीआम्हाला साथ दिल्यास मग तमिळ, तेलुगूकडे मोठ्या प्रमाणावर पोहोचण्यास सक्षम होतो असे सतीश निनासम यांनी सांगितले. बाईट
नव्या सरकारकडे सिनेसृष्टीकडून काहीतरी मागणार आहे असे सांगून, प्रत्येक तालुक्यात सिनेमागृहांचा विकास करून कमी दरात तिकिटे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी अभिनेते सतीश निनासम यांनी केली.
सर्व समाजातील लोक जातीय भेद विसरून एकत्र येण्याचे ठिकाण म्हणून सिनेमा टिकवणे ही आपली जबाबदारी आहे. असे ते म्हणाले. बाईट
शिवानंद मुत्तन्नवर, दिग्दर्शक नंदिश पत्रकार परिषदेला उपस्थित होते.


Recent Comments