Belagavi

स्वसंरक्षणासाठी कराटे शिकणे खूप महत्त्वाचे : गजेंद्र काकतीकर

Share

इंडियन कराटे क्लब, बेळगाव व बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कराटे ब्लॅक बेल्ट प्रदान सोहळा बेळगावात पार पडला.
कराटे हे स्वसंरक्षणासाठी एक उत्तम शस्त्र आहे ज्याचे योग्य प्रशिक्षण घेतलेले कोणीही पुढील प्रतिस्पर्ध्याची भीती न बाळगता लढू शकते. अशा प्रकारे बेळगाव शहरातील इंडियन कराटे क्लब बेळगावातील तरुणांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देत आहे.


येथे प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना रविवारी सायंकाळी शहरातील हिंद सोशल क्लब येथे ब्लॅक बेल्ट देऊन गौरविण्यात आले. आदित्य राज यादव, रिया अजय सातेरी, अनुज घोली आणि मुस्कान वाधवानी यांना इंडियन कराटे क्लबचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर व हेमलता काकतीकर यांच्या हस्ते ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आले. फ्लो
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुधीर कुलकर्णी, महेश अनगोळकर, सतीश नाईक, डॉ. समीर हावेरी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वसंरक्षणासाठीची कराटेची प्रात्यक्षिके सादर केली.

यानंतर ब्लॅक बेल्ट मिळालेल्या विद्यार्थ्यांनी इन न्यूजशी बोलताना सांगितले की, सुरुवातीला आम्ही खूप घाबरलो होतो, पण हे कराटे शिकल्याने आम्हाला आणखी बळ मिळाले आहे. बाईट
त्यानंतर बोलताना गजेंद्र काकतीकर म्हणाले की, कराटे हा एक चांगला क्रीडा उपक्रम आहे. ज्यामुळे आम्हाला आमच्या स्वसंरक्षण आणि क्रीडा कोट्यामध्ये सरकारी नोकरीची संधी मिळू शकते.
एकंदर कराटेचे असे सर्व स्वरक्षणाचे शिक्षण सर्वानी घेणे आवश्यक आहे.

Tags: