Belagavi

बेळगावात अग्निशमन दलाने वाचवले खेचराचे प्राण 

Share

20 फूट खोल विहिरीत पडलेल्या खेचराला अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून बाहेर काढून वाचविले. बेळगावच्या खासबागमध्ये आज दुपारी ही घटना घडली.

याबाबतची माहिती अशी की, बेळगावचे उपनगर असलेल्या खासबागमधील टीचर्स कॉलनीतील नवीन हेरेकर यांच्या घरासमोरील अरुंद विहिरीत तेथे भटकणारे खेचर चुकून पडले. त्याच्या हंबरण्याच्या आवाजाने स्थानिकांना याची माहिती मिळाली. त्यानंतर दुपारी सव्वाएकच्या सुमारास अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली.

त्यानंतर अग्निशमन दल अधिकारी व्ही. एस. टक्केकर हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शिडी व दोरीच्या सहाय्याने अथक प्रयत्न करत खेचराला सुखरूप बाहेर काढले. सुमारे २०फूट खोल विहिरीत पडलेल्या या मूक जनावराचे प्राण वाचविल्याबद्दल स्थानिकांनी अग्निशमन दलाचे आभार मानले.

Tags: