भाजप सरकारच्या काळामध्ये भ्रष्टाचार झालेला नाही, गरज पडल्यास चौकशी होऊ द्या असे आव्हान देतानाच काँग्रेसला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात रस नाही अशी टीका केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली.

हुबळीतील आपल्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, काँग्रेसने जनतेला आश्वासने देऊन आशा दाखवली. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीतच दिलेली वचने पूर्ण करू, असे ते म्हणाले होते. पण आता ते त्या वचनांना तत्त्वत: मंजुरी दिल्याचे सांगत आहेत. त्यामुळे जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण होतील का? आश्वासनांना तत्त्वत: मंजुरी देणार असे निवडणुकीच्या वेळी ते म्हणाले होते का, असा सवाल त्यांनी केला.
आमच्या काळात पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम यासह कोणत्याही विभागात घोटाळा झालेला नाही. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे भाजप सरकारमध्ये घोटाळा झाला असेल तर त्याचीही चौकशी करू द्या असे आव्हान जोशी यांनी दिले. केंद्र सरकारकडून राज्याला किती अनुदान यायला हवे, याची माहिती यापूर्वीच देण्यात आली आहे. केंद्राकडून राज्याला मिळणाऱ्या अनुदानात वाढ झाली आहे. 2009 ते 2014 पर्यंत डिव्होल्यूशन फंड 148 टक्क्यांनी वाढला आहे असे ते म्हणाले. 2014 ते 2019 दरम्यान डिव्होल्यूशन फंडात 129% वाढ झाली आहे. 700, 800 कोटींचे डेव्हलपमेंट अनुदान 5000 ते 7000 कोटींवर आले आहे. सिद्धरामय्या यांनी हे समजून घ्यावे. ते म्हणाले की, निवडणुकीतील भाजपच्या पराभवाबाबत बैठक होत आहे.


Recent Comments