लायन्स क्लब ऑफ बेळगाव आणि ऑल इंडिया जैन फेडरेशन महावीर लिंब सेंटर, हुबळी यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगावात कृत्रिम पाय रोपण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


शिबिरात, जयपूर लिंब्स संघाकडून लाभार्थ्यांना कृत्रिम पाय बसवण्यात आले. लहान मुले व महिलांसह जेष्ठ वयोगटातील सुमारे 80 लाभार्थ्यांनी शिबिराचा लाभ घेतला.

प्रमुख पाहुणे सुग्गुल एळमली यांनी सांगितले की, लायन्स क्लब सातत्याने सामाजिक कार्य करत असून भविष्यातही आम्ही हे कार्य करत राहू. आजच्या शिबिरामुळे अनेक गरीब लोकांना मदत झाली.


Recent Comments