Belagavi

जगात ज्ञानापेक्षा मोठे अन्य काहीही नाही : रवी भजंत्री

Share

जगात ज्ञानापेक्षा मोठे अन्य काहीही नाही असे गटशिक्षणाधिकारी रवी भजंत्री यांनी सांगितले.


बेळगावातील महांतेश नगरातील डॉ. एफ. जी. हलकट्टी प्रार्थना भवनात साप्ताहिक प्रार्थनेदरम्यान रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले गट शिक्षणाधिकारी रवी भजंत्री यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी योग्य तो सल्ला व सूचना दिल्या. ते म्हणाले की, जगात ज्ञानापेक्षा मोठे अन्य काहीही नाही. अतिशय स्पर्धात्मक युगात जगणाऱ्या आजच्या मुलांना जीवनात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःला परिपूर्ण बनवावे.


यावेळी बोलताना लिंगायत संघटनेचे अध्यक्ष इरण्णा दयेन्नावर म्हणाले की, मुलांनी मनपूर्वक अभ्यास करून सुशिक्षित होऊन समाजातील लोकांना मदत केली पाहिजे. अडचणीतील मुलांना आम्ही आमच्या संघटनेकडून कोणतीही मदत करण्यास तयार आहोत. बाइट
यावेळी आनंद कर्की, अक्कमहादेवी तेग्गी, महादेवी अरळी, जयश्री चावलगी यांनी वचन गायन केले. रांगोळीद्वारे मानवी शरीराचे अवयव दाखविणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रवी पाटील होते. महांतेश मेनशिनकाई यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. व्ही. के. पाटील यांनी दासोह सेवा पुरस्कृत केली. यावेळी इन बेलगामचे प्रतिनिधी सुभानी मुल्ला यांचा सत्कार करण्यात आला. सुरेश नरगुंद यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष संगमेश अरळी, शशिभूषण पाटील, गीता तिगडी, पाटील सर, प्रसाद हिरेमठ, अनिल रगशेट्टी, प्रभू पाटील, शंकर शेट्टी, सदाशिव देवरमणी, मल्लिकार्जुन शिरगुप्पी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Tags: