Dharwad

सिद्धरामय्या यांच्याकडे राज्याची धुरा : इंदिरा कॅन्टीनमध्ये पोळी वाटप

Share

राज्यातील भाजप सरकारच्या काळात अवकळा आलेल्या इंदिरा कॅन्टीनला कर्नाटकात आता पुन्हा अच्छे दिन येण्याची आशा आहे.


यापूर्वी सिद्धरामय्या मुख्यमंत्री असताना राज्यात इंदिरा कँटीन योजना सुरु करण्यात आली होती. त्यामुळे लोकांना अल्प दरात जेवण मिळत होते. भाजपचे सरकार आल्यावर हा प्रकल्प रखडला होता. आता सिद्धरामय्या पुन्हा मुख्यमंत्री झाल्याने इंदिरा कॅन्टीन पुन्हा सुरू होण्याच्या तयारीत आहे. याच आनंदात धारवाडमध्ये नगरसेवक डॉ. मयूर मोरे आणि सिद्धरामय्या यांच्या चाहत्यांनी इंदिरा कॅन्टीनमध्ये पुरणपोळीचे जेवण वाटून आनंद व्यक्त केला.

सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री झाल्याने इंदिरा कॅन्टीन पुन्हा नव्या जोमाने सुरु होतील यात शंका नाही, त्यामुळे याच आनंदात हुबळी, धारवाड, दक्षिण कन्नड, बागलकोट अशा एकूण १७ इंदिरा कॅन्टीनमध्ये ९ हजार पोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. धारवाडच्या मिनी विधानसौधसमोरील इंदिरा कॅन्टीनमध्ये पोळीचे जेवण देण्यात आले आणि जनतेने आनंदाने पोळीच्या जेवणाचा आस्वाद घेतला.

Tags: