Belagavi

सुवर्णसौधला शक्तिकेंद्र बनवण्याची मागणी; रयत संघाकडून निदर्शने

Share

बेळगावातील सुवर्णसौधला शक्तिकेंद्र बनवण्याची मागणी करत कर्नाटक राज्य रयत संघाकडून आज सुवर्णसौधसमोर निदर्शने करण्यात आली.


2023 च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या सन्माननीय लोकप्रतिनिधींचा शपथविधी सोहळा सुवर्णसौधमध्ये व्हायला हवा होता, असे सांगत आज राज्य रयत संघटनेच्या वतीने सुवर्णसौधसमोर निदर्शने करण्यात आली.
आज बंगळुरू येथे नवीन सरकारचा शपथविधी समारंभ बेळगाव येथील सुवर्णसौध येथे घेण्याचे निवेदन राज्य रयत संघाने राज्यपालांना दिले. मात्र त्याला केराची टोपली दाखवत बेंगळूर येथेच हा कार्यक्रम घेण्यात आला. याच्या निषेधार्थ रयत संघाच्या कार्यकर्त्यांनी ही निदर्शने केली.

सुवर्णसौधसह उत्तर कर्नाटकाच्या सर्वच प्रश्नाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा संताप ज्येष्ठ शेतकरी नेते प्रकाश नाईक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला. जिल्ह्यातील साखर आयुक्त कार्यालयाचा जणू नाममात्र दर्जा झाले असून तेथे कोणतेही ठोस निर्णय होत नाहीत. सुवर्णसौधमध्ये सर्व कार्यालये पूर्ण क्षमतेने स्थापन करून ती बळकट करण्याचे काम करावे. उत्तर कर्नाटकच्या विकासाला सहकार्य करून सुवर्ण केंद्र एक शक्ती केंद्र म्हणून उदयास आले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

एकंदर, नव्या सरकारचा शपथविधी सुवर्णसौध ऐवजी बेंगळूर येथे घेतल्याने राज्य रयत संघटनेने निषेध नोंदविला आहे.

Tags: