महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी म्हणून के एल एस संचलित वसंतराव पोतदार पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या वतीने दोन दिवसीय कॉलेज इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते.
पहिल्या दिवशी मुलींनी वेगवेगळ्या वेशभूषामध्ये वेगवेगळ्या प्रादेशिक संस्कृतीचे दर्शन घडवत उपस्थितांना आकर्षित केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन पाहून उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात चांगलीच दाद दिली. यावेळी कॉलेजच्या प्राचार्या श्रीदेवी मालाज यांच्या हस्ते सुरुवातीला कार्यक्रमाला चालना देण्यात आली.
शिक्षक वर्ग संयोजक प्रथमेश गुर्जर, नीलम सोमनवर, यांनी मुलाच्या कलाकौशल्यावर भर देऊन आपले विचार मांडले. प्रामुख्याने यामध्ये फॅशन शो, संगीत, फोटोग्राफी, स्केचिंग डान्स अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन यानिमित्त करण्यात आले होते. तर दुसरे दिवशी विद्यार्थ्यांनी ट्रॅडिशनल डेही साजरा केला.
Recent Comments