Belagavi

सीईटी परीक्षेला आजपासून राज्यात सुरूवात

Share

कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाच्या 2023 च्या सीईटी परीक्षेला आज राज्यातील 592 केंद्रांवर प्रारंभ झाला.


संपूर्ण राज्यातून 2.61 लाख विद्यार्थी या सीईटी परीक्षेला बसले आहेत. कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाद्वारे सीईटी-2023 परीक्षा 20 मे ते 22 मे दरम्यान होणार आहे.
राज्यातील एकूण 2.61 लाख विद्यार्थ्यांपैकी 1.4 लाख मुली आणि 1.21 लाख मुले आणि 8 तृतीयलिंगी ही परीक्षा देत आहेत.


बेळगाव जिल्ह्यातील यूजी सीईटी परीक्षेसाठी शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी दाखल झाले आहेत. बेळगाव शहरात 6 हजार 722 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. शहरातील लिंगराज कॉलेज, गोगटे कॉलेज, सरदार कॉलेज, आरएलएस कॉलेज, ज्योती कॉलेज, बेननस्मिथ कॉलेज, गोगटे पीयू कॉलेज येथे सीईटी परीक्षेची केंद्रे आहेत.
परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना परीक्षा मंडळाने अनेक नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. सर्व परीक्षा केंद्रांभोवतीचा 200 मीटरचा परिसर निषिद्ध क्षेत्र म्हणून चिन्हांकित करण्यात आला आहे. पोलीस विभागाने योग्य सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कडक उपाययोजना केल्या आहेत.

Tags: