नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विजापूर शहर भाजपचे उमेदवार आणि हिंदू फायर ब्रँड नेते आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ विजयी झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यासाठी नवस बोललेल्या विजापूर महानगर पालिकेचे सदस्य प्रेमानंद बिरादार यांनी दंडवत घालून नवस पूर्ण केला.
निवडणुकीआधी नगरसेवक प्रेमानंद बिरादार यांनी यत्नाळ विजयी झाल्यास दंडवत घालण्याचा नवस बोलला होता. जिल्ह्यातील नागठाण मतदारसंघांतर्गत येणाऱ्या सुक्षेत्र ड्याबेरी वाग्देवी मंदिरात देवीला दंडवत घालून त्यांनी हा नवस पूर्ण केला.
बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी अप्रतिम विजय संपादन केला आहे. त्यामुळे मी देवीला बोललेलं नवस पूर्ण केला अशी प्रतिक्रिया नगरसेवक बिरादार यांनी यावेळी दिली.
यावेळी बसनगौडा पाटील-यत्नाळ यांचे चाहते व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments