Chikkodi

आता नव्या आमदारांसमोर चिक्कोडी जिल्हा करण्याचे आव्हान

Share

अपेक्षेप्रमाणे राज्यात काँग्रेसचे सरकार अस्तित्वात आले आहे. मात्र चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील दहा आमदारांसमोर अनेक आव्हाने आणि अपेक्षा आहेत. आमदारांसमोर कोणती आव्हाने आहेत हे जाणून घ्यायचे असेल तर पाहा हा रिपोर्ट.
चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील आठ विधानसभा मतदारसंघ आणि बेळगाव लोकसभा मतदारसंघातील दोन मतदारसंघ मिळून चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्याची निर्मिती होते. चिक्कोडीला जिल्ह्याचा दर्जा असलेले अधिकृत जिल्हा मुख्यालय म्हणून घोषित करणे हे नवीन आमदारांसमोर मोठे आव्हान आहे. राज्यात कोणतेही सरकार आले तरी चिक्कोडी जिल्हा म्हणून घोषित करू, असे आश्वासन विधान परिषदेचे सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी जनतेला खुल्या सभेत दिले आहे. राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होणार आहे. चिक्कोडीला वेगळा जिल्हा करणे हे या भागातील सर्व आमदारांसमोर मोठे आव्हान आहे.


2002 मध्ये बेळगाव व्यतिरिक्त चिक्कोडी हा शैक्षणिक जिल्हा म्हणून स्थापन करण्यात आला. अधिकृत जिल्ह्याचा दर्जा देण्यासाठी सरकार विलंब लावत आहे. बेळगाव सोडून चिक्कोडी हा वेगळा जिल्हा व्हावा यासाठी गेल्या 30 वर्षांपासून चिक्कोडी जिल्हा संघर्ष समिती सातत्याने लढा देत आहे. पण सरकारने त्याची दखल घेतली नाही. या निवडणुकीत जिल्ह्याची निर्मिती करणार असल्याचे लोकप्रतिनिधींनी सांगताच जिल्ह्याच्या स्वप्नाला पुन्हा अंकुर फुटला आहे. फ्लो
चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यात चिक्कोडी-सदलगा मतदारसंघाचे आमदार गणेश हुक्केरी, निपाणी मतदार संघातून शशिकला जोल्ले आणि रायबाग मतदारसंघातून दुर्योधन ऐहोळे हे पुन्हा निवडून आले आहेत. कुडची मतदारसंघातून महेंद्र तम्मन्नवर, कागवाड मतदारसंघातून राजू कागे, अथणीत लक्ष्मण सवदी, हुक्केरीतून निखिल कत्ती, यमकनमर्डी मतदारसंघातून सतीश जारकीहोळी, गोकाक मतदारसंघातून रमेश जारकीहोळी तर अरभावीतुन भालचंद्र जारकीहोळी आमदार म्हणून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. वेगळा जिल्हा जाहीर करणे ही या सर्व आमदारांवर मोठी जबाबदारी आहे.


करगाव उपसा जलसिंचन प्रकल्प :
गेल्या भाजप सरकारच्या शेवटच्या टप्प्यात रायबाग मतदारसंघातील चिक्कोडी तालुक्याच्या करगाव उपसा जलसिंचन प्रकल्पाला मंजुरी मिळून निविदा काढण्यात आल्या आहेत. आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी या सरकारच्या काळात हे काम पूर्ण करून शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे.
दुष्काळी भागाला सिंचनाची सुविधा देतील या विश्वासाने शेतकऱ्यांनी चौथ्यांदा ऐहोळे यांची निवड केली आहे. आमदार दुर्योधन ऐहोळे यांच्याकडून येत्या वर्षभरात सिंचन प्रकल्प पूर्ण होण्याच्या आशा मतदारसंघातील जनतेला आहेत.
महालक्ष्मी उपसा जलसिंचन प्रकल्प :
हा चिक्कोडी तालुक्याच्या पश्चिम भागातील लोकांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देणारा प्रकल्प आहे. भाजप सरकारच्या काळात हा प्रकल्प मंजूर झाला. सध्या या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. काम पूर्ण करून शेतकऱ्यांना पाणी देण्याची जबाबदारी आमदार गणेश हुक्केरी यांच्यावर आहे.
बेळगाव व्यतिरिक्त चिक्कोडी जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे 25 लाख आहे. त्यामुळे चिक्कोडी भागासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापन करण्याची जबाबदारी चिक्कोडीच्या आमदारावर आहे.
निप्पाणी तालुक्याच्या निर्मितीला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र सर्व विभागांची शासकीय कार्यालये स्थलांतरित झालेली नाहीत. आमदार शशिकला जोल्ले यांच्यासमोर सर्व विभाग कार्यालयांना स्वत:ची इमारत बांधून मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आव्हान आहे. फ्लो
एकंदरीतच सध्या निवडून आलेल्या आमदारांसमोर अनेक आव्हाने आहेत. पुढील पाच वर्षात कोणत्या क्षेत्रात किती कामे होतील याची वाट पहावी लागेल.
डी. के. उप्पार, ईन न्यूज, चिक्कोडी.

Tags: