Belagavi

हिरेबागेवाडी हजरत गौस शाह काद्री दर्ग्याचा उरूस सुरु

Share

हिरेबागेवाडी हजरत गौस शाह काद्री दर्ग्याचा संदल आणि उरूस कार्यक्रमाला आजपासून उत्साहात प्रारंभ झाला.
उत्तर कर्नाटकमध्ये हिरेबागेवाडी दर्गा प्रसिद्ध धार्मिक स्थळ म्हणून ओळखला जातो.

तेथे सर्व समाजाचे लोक भेट देऊन एकत्र येऊन प्रार्थना करतात. दरवर्षी या दर्ग्याच्या उरूस कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने उत्साहात साजरा करण्यात येतो.

रात्रभर विविध मार्गांवरून संदल मिरवणूक काढून आज गुरुवारी सकाळी दर्ग्यामध्ये धार्मिक कार्यक्रमांना चालना देण्यात आली.


यावेळी बोलताना दर्ग्याचे अज्जा यांनी सांगितले की, दरवर्षी बेळगाव, हुबळी, धारवाड, विजापूर, बागलकोट, गोवा आणि महाराष्ट्रातून लाखो भाविक या कार्यक्रमात सहभागी होतात. पाच दिवसांच्या कार्यक्रमात कव्वाली, नाटक आणि कुस्ती मैदान आदी अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

 

सर्वानी या कार्यक्रमांत भाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.


या संदल कार्यक्रमात बेळगाव शहर आणि ग्रामीण भागातील भाविकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला.

Tags: