Belagavi

बेळगावात हाज यात्रेकरूंसाठी लसीकरण शिबिर

Share

बेळगावहून हाज यात्रेसाठी सौदी अरेबियाला जाणाऱ्या हाज यात्रेकरूंना लसीकरण शिबिराचे बेळगावात आज आयोजन करण्यात आले होते.

दरवर्षी शेकडो मुस्लिम बांधव बकरी ईद सणानिमित्त हाज यात्रेला रवाना होतात. यावर्षी पण हाज कमिटीने निवडलेल्या आणि स्वखर्चाने जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी लसीकरण सक्तीचे आहे. त्यामुळे बेळगावातील अंजुमन सभागृहात आज आरोग्य खाते, अंजुमन इस्लाम यांच्या संयुक्त विद्यमाने लसीकरण शिबीर घेण्यात आले.

जिल्हा आरोग्य खात्याच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सुमारे 400हुन अधिक लोकांची आरोग्य तपासणी करून त्यांना लस दिली. या शिबिरात भाग घेऊन बोलताना माजी आ. फिरोज सेठ यांनी यात्रेकरूंना संबोधित केले. नंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की,

दरवर्षी केंद्रीय हाज कमिटीद्वारे विविध राज्यातून लाखो लोकांना निवडून हाज यात्रेला पाठवले जाते. सर्व हाज यात्रेकरूंना सरकारचे नियम पाळावेत, तेथे गेल्यावर आपल्या देशाची सुरक्षा, बंधुभाव आणि शांतता कायम राहू दे अशी प्रार्थना करण्याचे आवाहन केले.

यावेळी अंजुमन संस्थेचे सचिव व नगरसेवक समीउल्ला माडीवाले, बाबुलाल मुजावर, गफूर घीवाले आदी उपस्थित होते.

Tags: