Belagavi

माणसांची मने शुद्ध करण्यासाठी मंदिरांची गरज : पंचम शिवलिंगेश्वर स्वामीजी

Share

माणसाचे मन शुद्ध करायचे असेल तर मंदिरे असली पाहिजेत असे निडसोसीचे पंचम शिवलिंगेश्वर स्वामीजी यांनी सांगितले.


रायबाग तालुक्‍यातील नसलापूर गावातील श्री कलमेश्वर मंदिराचा कळसारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. स्वामीजी पुढे म्हणाले की, सरकार आणि देणगीदार मंदिरे बांधण्यासाठी देणगी देतात. नुसती देणगी दिली जात नाही तर मंदिरांमुळे माणसांची मने शांत आणि स्थिर रहावीत या उद्देशाने ती बांधली जातात. प्रत्येकाने मंदिराला भेट देऊन आपले मन आणि जीवन शांत ठेवावे. समाजात आदर्श व्यक्ती म्हणून ओळख होण्यासाठी मंदिरे मदत करतात असे त्यांनी सांगितले.


निडसोसी येथील श्री शिवलिंगेश्वर महास्वामी, बिदरचे महंत स्वामीजी, चिक्कोडीचे शून्य संपादन चरमूर्ती मठाचे श्री शिवबसव स्वामी, बावनसौंदत्तीच्या ओंकार आश्रमाचे श्री शिवशंकर स्वामीजी, नंदीकुरली येथील श्री पंचलिंगेश्वर वीरभद्र स्वामी यांनी मंदिरात पूजा केली.
तत्पूर्वी गावातील रस्त्यांवर सर्व सुवासिनींनी जलकुंभ मिरवणूक काढली.


यावेळी आमदार दुर्योधन ऐहोळे, चिक्कोडी कारखान्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे, कारखान्याचे संचालक भरतेश भनवणे, राजागौडा पाटील, जयपाला भनवणे, विभावरी नसलापुरे, नेमिनाथ खोंबरे, मल्लाप्पा म्हैशाळे, शिवाप्पा नाईक, सत्याप्पा तोरसे, चौगुले पाटील, शंकर कुंभार, निंगाप्पा कुंभार, शिवाजी कुंभार, गावचे नेते व ग्रामस्थ उपस्थित होते. विशाल तोरसे यांनी सूत्रसंचालन केले, परिचय पवन तोरसे यांनी, स्वागत महांतेश हिरेमठ यांनी केले. विजय कुंबार यांनी आभार मानले.

Tags: