बेळगाव येथील भीमा रिद्दी डिजिटल सर्व्हिस अर्थात बीआरडीएस रिद्दी व्हिजनचा 28 वा वर्धापनदिन सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.
रिद्दी व्हिजन गेली अनेक वर्षे केबल टीव्ही क्षेत्रात कार्यरत असून आज खडेबाजारमधील समसुखा कॉम्प्लेक्समधील मुख्य कार्यालयात केक कापून संस्थेचा 28 वा वर्धापन दिन शानदार समारंभात साजरा करण्यात आला.
यावेळी बोलताना मेट्रो कास्टा इंडिया लिमिटेडचे एमडी नागेश छाब्रिया म्हणाले की, सर्व केबल ऑपरेटर्सच्या सहकार्याने आम्ही या व्यवसायात 28 वर्षे पूर्ण केली आहेत. सर्वांच्या एकसंघ प्रयत्नाने आम्ही या स्तरावर पोहोचलो आहोत आणि यापुढेही नवनवीन तंत्रज्ञानाद्वारे ग्राहकांना मनोरंजन सेवा देत राहू असे सांगून त्यांनी ग्राहकांचे सहकार्याबद्दल आभार मानले.

त्यानंतर केबल ऑपरेटर सतीश पाटील म्हणाले की, 28 वर्षांपूर्वी हीच केबल नेटवर्क सेवा बेळगावच्या काही शहरी भागात सुरू होती, आता ते कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, कलकत्ता यासह अनेक राज्यांमध्ये सेवा देत आहेत. त्याचे प्रमुख नागेश छाब्रिया आणि निशा छाब्रिया यांच्या प्रयत्नांमुळे संस्थेने ही पातळी गाठली आहे. त्यामुळे त्यांना पुढील प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. –
यावेळी सत्यनारायण जोशी, इन न्यूज हेड राजशेखर पाटील, संतोष पर्वतराव, केबल ऑपरेटर व कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments