शांतिनिकेतन शाळेच्या वतीने मनिषा हलगेकर यांच्या नेतृत्वाखाली नूतन आमदार विठ्ठल हलगेकर यांचा सत्कार करण्यात आला.

खानापुर तालुक्यातील शांतिनिकेतन शाळा ही विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आदर्श शाळा आहे.या शाळेचे नेतृत्व महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठला हलगेकर यांच्याकडे आहे.तसेच आमदार म्हणून निवडून येऊन तालुक्याच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी त्यांनी उचलली आहे.

त्यांच्या नेतृत्वाखाली शांतिनिकेतन शाळेचा आगामी काळात विकास होणार आहे. मनीषा हलगेकर यांच्या नेतृत्वाखाली ,शाळेतील सर्व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांचा गौरव केला.आमदार विठ्ठल हलगेकर यांनी त्यांच्या सहकार्याने शिक्षणासोबतच तालुक्याच्या विकासावर अधिक भर देणार असल्याचे सांगितले.


Recent Comments