Belagavi

अखेर पुन्हा फडकला किल्ला तलावाजवळील राष्ट्रीय ध्वज

Share

बेळगाव उत्तरचे आ . आसिफ सेठ यांनी शहरातील किल्ला तलावाजवळील , राष्ट्रीय ध्वजाचे अनावरण केले . यावेळी त्यांनी मतदारसंघातील जनतेला आवश्यक असलेल्या सुविधा आणि विकास कामे प्रामाणिकपणे पूर्ण करून जनतेला पूर्ण सहकार्य देऊ असा भरवसा दिला .


माजी आ . फिरोज सेठ यांच्या कार्यकाळात देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा तिरंगा , बेळगावमधील किल्ला तलावाजवळ अनावरण करण्यात आला होता . मात्र काही तांत्रिक कारणामुळे तसेच , या उंच ध्वजस्तंभ तसेच तिरंग्याच्या देखभालीच्या खर्च महानगर पालिकेला झेपत नसल्याने , मध्यंतरीचा काही काळ ध्वजस्तंभावर हा विशाल तिरंगा फडकवण्यात आला नव्हता . मात्र
आता बेळगाव उत्तरचे काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार आसिफ सेठ यांनी , बेंगळूरहून सीएलपी बैठकीहुन परतल्यानंतर , आज किल्ला तलाव परिसरातील ह्या ध्वजस्तंभावर तिरंगा फडकावला .


यानंतर बोलताना , आ . आसिफ उर्फ राजू सेठ यांनी सांगितले कि ,प्रचारावेळी सांगितल्याप्रमाणे आपण हा तिरंगा फडकावला आहे . राष्ट्रीय ध्वज हा आपला स्वाभिमान आहे . प्रति आपल्याला आदर आहे . आणि तो प्रत्येकाला मनापासून वाटायला हवा . आम्ही राष्ट्रीय ध्वज फडकविण्याचे पहिले काम केले आहे . महानगर पालिकेचे आयुक्त आणि , महानगर पालिकेला या ध्वजाबद्दल सूचना दिल्या आहेत . तांत्रिक कारण किंवा पावसामुळे काही अडचण असेल तर त्या व्यतिरिक्त हा ध्वज नियमित फडकला पाहिजे अशी सूचना दिली आहे . यावेळी त्यांनी शहरातील विकासकामे करण्यासहीत , जनतेला सहकार्य देऊ जनतेला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले .

तर माजी आ .फिरोज सेठ यांनी , त्यांच्या कार्यकाळात जनतेसाठी निर्माण करण्यात आलेल्या सोयीसुविधांचा लाभ जनतेला उपलब्ध करून न दिल्याचा आरोप भाजप सरकारवर केला . आमची सर्व कामे पेंडिंग ठेवली . ३ स्विमिंग पूल , जिम्नॅशियम , ग्लासहाऊस बंद ठेवण्यात आले . आता आमचे सरकार पुन्हा आले आहे . आमचे सरकार भ्रष्टाचार मुक्त सरकार आहे . जनतेच्या कराच्या पैशांचा योग्य विनियोग करून , विकास कामे राबवू असे ते म्हणाले .
यावेळी , त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना मुद्देसूद आणि सविस्तर उत्तरे दिली .

Tags: