Belagavi

उन्हाळी सुटीचा आनंद लुटण्यासाठी सी -टनेल ऍक्वेरियमला पसंती

Share

 

शोभिवंत , तसेच गोड्या आणि खाऱ्या पाण्यातील मासे , सागरी जैवविविधता , आणि सागरी जीवनाची सफर करण्याची संधी बेळगावमध्येच उपलब्ध झाली आहे . खास उन्हाळी सुटीचा आनंद लुटण्यासाठी , चक्क मत्स्यालयच बेळगावकरांच्या भेटीला आले आहे . सी -टनेल ऍक्वेरियम प्रदर्शनाला बेळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे .


बेळगावात प्रथमच २०,००० चौ. मी. क्षेत्रात भव्यदिव्य मत्स्यालय पाहण्यासाठी उपलब्ध झाले आहे . सदर प्रदर्शन सीपीएड कॉलेज मैदान, क्लब रोड, बेळगाव येथे एप्रिलपासून सुरू झाले आहे. या मत्स्यालयात , सागरी जैवविविधता पाहायला मिळत आहे . साधारणपणे , उन्हाळी सुटी घालवण्यासाठी लोक , आपल्या मुलांसह कुठलेतरी हिलस्टेशन किंवा समुद्र किनारी जाणे पसंत करतात . मात्र आता बेळगावमध्ये मत्स्यालय आल्याने , लोकांनी याला पसंती दर्शवली आहे . या प्रदर्शनात , विविध प्रकारचे मासे, सी हॉर्स, बॉक्स फिश, काउ फिश, ईल, रॉस आणि सामान्य फिश, सागरी जीवांसह विदेशी प्रजातींचे विदेशी निरीक्षण करता येते. जलचर जीवनाची सफारीही अनुभवता येते. मत्स्यालयात गोड्या तसेच खाऱ्या पाण्यातील मासे , तसेच विदेशी मासे अशा जवळपास पाचशे प्रजाती पाहायला मिळत आहेत

या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे . या प्रदर्शनाला भेट दिलेल्या लोकांनी सांगितले कि , गेल्या लॉकडाऊन कालावधीपासून शहरात असा कोणताही शो पाहिला नाही. बेळगावमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचा शो पाहायला मिळत आहे. येथे विविध प्रकारच्या माशांची माहिती मिळाली. हा एक नवीन अनुभव आहे.

या प्रदर्शनात महिलांच्या दैनंदिन वस्तूंपासून विविध प्रकारचे कपडे आणि तसेच विविध राज्यातील वस्तू आणि पदार्थांचे स्टाइल्स लावण्यात आले आहेत . मनोरंजनासोबतच , खाद्यपदार्थांवर ताव मारीत , या ठिकाणी खरेदीचा आनंद देखील लोक लुटत आहेत .

एकंदर , बेळगावात या प्रकारच्या प्रदर्शनाच्या आयोजनाने लोकांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. मनोरंजनसह , सागरी जलचर जीवनाची सफर करायला मिळत आहे .

Tags: