Belagavi

कांडप मशीनच्या आवाजामुळे गिरणी बंद करण्यासाठी शेजाऱ्यांचा दबाव

Share

केंद्र सरकार आणि राज्य सरकारने महिलांना समाजातील स्वयं रोजगाराच्या अनेक संधी दिल्या आहेत . त्यांच्यासाठी अनेक योजना राबवल्या होत्या. मात्र समाजाकडून महिलांना सहकार्य मिळत नसल्याचे उदाहरण शहरातील गोंडवाड येथे पाहायला मिळाले .


बेळगाव शहरातील गोंडवाड येथील रहिवासी मीनाक्षी भोवी यांनी 4 लाख 50 हजार रुपये खर्चून व्यवसायासाठी मिरची कांडप आणि पिठाची गिरणी बांधली आहे, मात्र मशिनचा आवाज हा सतत त्रासदायक ठरतअसल्याने तिने ती गिरणी बंद करावी अशी मागणी शेजाऱ्यांकडून होत आहे. .


मीनाक्षी भोवी यांनी सांगितले की, मी सरकारकडून कोणतेही थेट कर्ज न घेता संघांकडून कर्ज घेऊन हे काम सुरू केले असून ग्रामपंचायतीकडून परमिटही मिळाले आहे.तसेच काम सुरू करण्यास कोणतीही अडचण नाही, असे सांगण्यात आले आहे . मात्र ग्रामपंचायत सुद्धा परमिटचे नूतनीकरण करत नाही.आमची कोणतीही अडचण नाही,माझा आक्षेप नाही. शेजारचे लोक ग्राहकांना येण्यापासून रोखत आहेत, मी या कामावर अवलंबून आहे . मी या व्यवसायासाठी गुंतवलेले साडेचार लाख रुपये जर मला हे लोक देत असतील तर मी हा व्यवसाय बंद करायला तयार आहे .

याबाबत बोलताना बी.के. कंग्राळी ग्रामपंचायतीचे पीडीओ बारगी यांनी सांगितलेय कि , आम्हाला यात कोणतीही अडचण नाही. शेजाऱ्यांशी जुळवून घ्यावे असे आम्ही सांगितले आहे . पण हे लोक मला त्रास देत आहेत मला न्याय द्या असे असे पीडित महिलेने सांगितले.

Tags: