Banglore

आगामी निवडणुकीदरम्यान आम्ही कठोर परिश्रम करू :हंगामी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

Share

 

पक्ष संघटना आणि आम्हाला विश्रांती नाही, निवडणुकीदरम्यान आम्ही कठोर परिश्रम करू आणि त्यानंतर आमच्या राष्ट्रीय पक्षाचे कार्यक्रम लोकांसमोर नेण्याची जबाबदारी आमच्यावर असेल, असे हंगामी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.

बंगळुरू येथील भाजप कार्यालयात प्रसारमाध्यमांना उत्तर देताना बोम्मई म्हणाले की, पक्षाची पुनर्रचना करण्यासाठी पक्ष सतत प्रयत्नशील राहील.आम्ही चुका सुधारून आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी करू. मोदी राज्यात आल्याने भाजपला पराभवाचा सामना करावा लागला या पत्रकांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले कि , ते फक्त कर्नाटकात प्रचारासाठी आले होते . काँग्रेसचा फक्त राज्यात विजय झाला आहे. अशी टीका त्यांनी केली.

काही दिवसांत निवडून आलेल्या उमेदवारांची बैठक बोलावून सर्व नेत्यांकडून निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.

Tags: