कागवाड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक चुरशीच्या पद्धतीने पार पडली, त्यात काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजू कागे हे पाचव्यांदा सुमारे 8000 मतांनी निवडून आले. बेळगावहून कागवाड मतदान केंद्रावर आलेले आमदार राजू कागे यांचे कार्यकर्त्यांनी जेसीबीतुन पुष्पवृष्टी करून जल्लोषात स्वागत केले.


शनिवारी सायंकाळी आमदार राजू कागे यांचे कागवाड मतदारसंघातील शिरगुप्पी, कागवाड, शेडबाळ, उगार या गावात आगमन होताच पुष्पवृष्टी करून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
आमदार राजू कागे यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानून कागवाड मतदारसंघातील सर्व विकासकामे हाती घेऊन जनतेच्या समस्या सोडविण्याचा विचार व्यक्त केला.
कागवाड मतदारसंघातील लाखो शेतकऱ्यांचे स्वप्न असलेला खिळेगाव बसवेश्वर सिंचन प्रकल्पही माझ्याच कार्यकाळात सुरू झाला, त्याचे उद्घाटन आता मी पूर्ण करेन, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
त्यांचा भाऊ सिद्धगौडा कागे, मुलगा प्रसाद कागे, शंकर वाघमोडे, प्रशांत अपराज, अजित चौघुले, रमेश चौघुले, विनोद बारगळे, नाथगोंडा पाटील, प्रकाश पाटील, कुमार पाटील, अजित रंजुणगे, अण्णा अरवडे, भरत उपाध्याय, राहुल शहा, वसंत खोत , राजू मदने. आणि हजारो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments