बेळगांव : हिंदवाडी येथील रहिवासी सविता वसंतराव कालकुंद्रीकर यांचे राहत्या घरी वयाच्या 85 व्या वर्षी सायंकाळी निधन झाले. त्या कालकुंद्रीकर कुटुंबाच्या मोठ्या वहिनी होत्या. तसेच मुंबईस्थित सिने क्षेत्रातील कसा दिग्दर्शक यशवंतराव जाधव यांच्या कन्या होत. रणझुंझारचे संपादक मनोहर व प्रकाश कालकुंद्रीकर यांच्या वहिनी होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून व नातवंड आहेत. निधनानंतर कालकुंद्रीकर कुटुंबियांनी त्यांच्या नेत्रदानाचा निर्णय घेऊन जायंट्स आय फौंडेशनचे मदन बामणे यांच्याशी संपर्क साधून नेत्रदानाविषयी कळविले.
त्यानुसार केएलई नेत्रपेढीच्या डॉ चैत्रा शेखर आणि डॉ जयंत रेड्डी यांनी प्रक्रिया पूर्ण केली.
सविता यांच्या नेत्रदानाने दोन अंध व्यक्तीना दृष्टी प्राप्त होणार आहे.
Recent Comments