जिल्ह्यातील सर्व नेते व सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली 12 मतदारसंघात आम्ही विजयी होऊ असे सांगितले होते , मात्र 11 मतदारसंघात आम्ही विजयी झालो.बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणाच्या इतिहासातील हा अभूतपूर्व विजय असल्याचे लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या.

शहरातील सांबरा विमानतळावर बोलताना त्या म्हणाल्या कि , मी हायकमांड, केपीसीसी अध्यक्ष डी के शिवकुमार आणि सीएलपी नेते सिद्धरामय्या यांच्याशी बोलले आहे आणि त्यानुसार जिल्ह्यातील 11 जागा जिंकून ते धैर्याने सीएलपीच्या बैठकीत बोलणार आहेत. लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, काँग्रेस पक्षाच्या विजयाचे प्रमुख कारण जिल्ह्याचे नेतृत्व आणि जिल्ह्याची एकजूट आहे.
जिल्ह्याला किती मंत्रीपदे मिळू शकतात, या माध्यमांच्या प्रश्नावर लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, दिलेली जबाबदारी पार पाडण्यापूर्वी हायकमांडने राज्यातील जनतेला दिलेली पाच आश्वासने पूर्ण करणे हे आपले कर्तव्य आहे.


Recent Comments