खूप वर्षानंतर शालेय जीवनातील मैत्रिणीना भेटून , आपण वय विसरून, शाळेच्या विश्वात पुन्हा रममाण झाल्याचे , मराठा मंडळ संचालित जिजामाता हायस्कुलच्या माजी विद्यार्थींनीनी सांगितले .

जिजामाता हायस्कुलच्या सन १९९९ ते २०१० पर्यंतच्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता . या निमित्ताने , शिक्षकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता . विविध ठिकाणी स्थायिक झालेल्या या विद्यार्थिनी या निमित्ताने एकत्र जमल्या होत्या . प्रत्येकीच्या चेहऱ्यावर , आपल्या मैत्रिणींना भेटल्याने आनंद ओसंडून वाहत होता .
यावेळी विद्यार्थिनींनी आपल्या शिक्षकाची पाद्यपूजा करून , त्यांचा सत्कार करून आशीर्वाद घेतला .
यांनतर बोलताना , कावेरी गवस यांनी सांगितले कि , शाळेतील शिक्षकांच्या आणि मैत्रिणींच्या सहकार्यामुळे आम्ही आज हा स्नेहमेळावा आयोजित केला आहे . आम्ही मैत्रिणी बरीच वर्षे एकमेकांच्या संपर्कात नव्हतो . मात्र या कार्यक्रमामुळे आमचे शिक्षक आणि मैत्रिणींना भेटण्याची पुन्हा संधी मिळाली .
तर इतक्या वर्षांनंतर आपल्या मैत्रिणींना भेटून , भारावून आणि अत्यानंदित झालेल्या विद्यार्थिनींनी , आपल्या शाळेतील आठवणी पुन्हा जाग्या झाल्याचे सांगितले . आम्ही केलेली मस्ती , काढलेल्या खोड्या , आमची लुटुपुटीची भांडणे , सर्व काही आठवत आहे . पुन्हा लहान झाल्यासारखे वाटत आहे . आ आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही असे त्या म्हणाल्या .
यावेळी १९९९ ते २०१० पर्यंतच्या दहावीच्या बॅचच्या सर्व माजी विद्यार्थिनी आणि त्यांचे शिक्षक उपस्थित होते .
Recent Comments