Belagavi

मुख्यमंत्री पदाचा निर्णय हायकमांडवर अवलंबून

Share

काँग्रेस पक्षाचे तत्वज्ञान आणि सिद्धमय्या डीके शिवकुमार, सुरजेवाला आणि काँग्रेसचे राष्ट्रीय मल्लिकार्जुन खर्गे आणि कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे राज्यात काँग्रेसला अभूतपूर्व विजय मिळाला. असे बेळगाव उत्तर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ म्हणाले .

बेळगावच्या सांबरा विमानतळावर बोलताना ते म्हणाले कि , सर्व नेते , मतदार संघातील जनता , , समाजाचे कार्यकर्ते खूप सहकार्य करत होते., पुढचा मुख्यमंत्री कोण होणार, या प्रसारमाध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले हे सर्व हायकमांडवर अवलंबून आहे.

जगदीश शेट्टर यांच्यावतीने बोलताना ते म्हणाले की, शेट्टर यांचा पराभव झाल्याचे खूप दुःख आहे.ते अतिशय साधे आणि मृदू व्यक्तिमत्वाचे असून आपण नेहमीच शेट्टर यांच्या पाठीशी उभे राहू .

कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला आहे असे सांगून ,राजू सेठ म्हणाले की, जनतेला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे उरलेली विकासकामे मतदारसंघात करून दाखवून, समाजासाठी समानतेने काम करू.

Tags: