विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा विजय मिळवून दिल्याबद्दल कर्नाटकच्या जनतेचे आभार मानतो असे केपीसीसीचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी सांगितले.
बंगळुरू येथील सदाशिवनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना डीके शिवकुमार म्हणाले की, राज्यातील जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला हा विजय दिला आहे. त्यांच्या चरणी माझा प्रणाम. आमच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि आम्हाला निष्ठावान बहुमत दिल्याबद्दल धन्यवाद म्हणत त्यांना अश्रू अनावर झाले.
या विजयाने राज्यातील जनता खूश आहे. राज्य आणि केंद्रातील सर्व नेते आणि कार्यकर्त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा विजय शक्य झाल्याचे डीके शिवकुमार म्हणाले. भाजपवाल्यानी कटकारस्थान करून मला तुरुंगात टाकले होते. त्या दिवशी सोनिया गांधी मला भेटण्यासाठी तिहार तुरुंगात आल्या होत्या. नंतर माझी केपीसीसी अध्यक्ष म्हणून निवड केली. राज्य व केंद्रातील सर्व नेत्यांनी मला सहकार्य केले आहे.
“काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी खूप मेहनत घेतली. जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला, नेत्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. हे सामूहिक नेतृत्वाचं फळ आहे. मी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जून खरगे यांना विश्वास देतो की, आम्ही कर्नाटकच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू.


Recent Comments