election

विश्लेषण करून लोकसभा निवडणुकीत पुनरागमन करू : बोम्मई

Share

विधानसभा निवडणुकीत भाजपची पीछेहाट झाल्यानंतर काय चुकले, कोठे चुकले याचा शोध घेण्यास भाजपने प्रारंभ केला आहे. निवडणूक निकालाचा सविस्तर विश्लेषण करून लोकसभा निवडणुकीत पुनरागमन करू अशी प्रतिक्रया मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप कार्यकर्त्यांनी भरपूर प्रयत्न करूनही आम्हाला बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. एकदा पूर्ण निकाल जाहीर झाला की पक्षनेत्यांच्या बैठकीत आम्ही त्याचं सविस्तर विश्लेषण करू. आम्ही या निकालावरून धडा घेत लोकसभा निवडणुकीत पुनरागमन करू असे त्यांनी सांगितले.

Tags: