कार्यकर्त्यांनी सौंदत्ती मतदार संघात अभूतपूर्व इतिहास रचला आहे. त्यांच्या परिश्रमामुळेच मी विजयी होऊ शकलो अशी प्रतिक्रिया सौंदत्ती मतदार संघातील काँग्रेसचे विजयी उमेदवार विश्वास वैद्य यांनी दिली.

निकाल जाहीर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस उमेदवार विश्वास वैद्य यांनी आपल्या विजयाचे श्रेय पक्ष कार्यकर्त्यांना दिले. सौंदत्ती मतदार संघात खूप चुरस होती. पण आमच्या कार्यकर्त्यांनी खूप परिश्रम घेतले. हा अभूतपूर्व इतिहास रचणाऱ्या कार्यकर्त्यांचा मी आभारी आहे. आता मतदारसंघाच्या विकासावर लक्ष देणार आहे असे वैद्य यांनी सांगितले.
यावेळी वैद्य यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments