कागवाड मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार राजू कागे यांच्या विजयाचा त्यांच्या उगार येथील निवासस्थानी कार्यकर्ते व कुटुंबीयांनी जल्लोष केला.

शनिवारी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार राजू कागे हे पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आल्याने त्यांच्या उगार येथील निवासस्थानी त्यांचे कार्यकर्ते, चाहते व कुटुंबीयांनी फटाके व गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.
कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचा झेंडा हातात धरून जल्लोष केला . . अनेक वर्षांनी कागे कुटुंबाकडे आमदारपद आल्याने त्यांनी आनंदोत्सव साजरा केला .
आमदार राजू कागे यांची पत्नी मंगला कागे आणि त्यांच्या दोन मुली कृतिका आणि तृप्ती यांनी मिठाई आणून कुटुंबाने आनंदोत्सव साजरा केला.
.मंगला राजू कागे म्हणाल्या की, आजचा विजय केवळ आमचा नसून संपूर्ण मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा आहे. या निवडणुकीत आम्हाला विजयी करण्याचा निर्धार मतदारसंघातील कार्यकर्ते व मतदारांनी आधीच केला होता. याचे सर्व श्रेय मतदारांना जाते, अनेक वर्षांनी आमच्या कुटुंबाला पुन्हा आमदारपद मिळाले. मतदारसंघातील जनतेची जमेल तशी सेवा करू, असे त्या म्हणाल्या .
डॉ. राजू पाटील, भरत उपाध्याय, प्रेमलता रेड्डी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच कागवाड मतदार संघातील सर्व गावागावात काँग्रेस कार्यकर्ते जल्लोष करत आहेत. प्रत्येक गावात पोलीस विभागाकडून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


Recent Comments