election

धारवाड ग्रामीणमध्ये काँग्रेसचे विनय कुलकर्णी 18114 मतांनी विजयी

Share

 

धारवाड ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार विनय कुलकर्णी 18114 मतांनी विजयी झाले आहेत.

सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झालेल्या मतमोजणीत पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत विनय कुलकर्णी यांनी आघाडी घेतली होती .शेवटी भाजपच्या उमेदवार अमृत देसाई यांना 70,546 मते मिळाली, तर काँग्रेसच्या उमेदवार विनय कुलकर्णी यांना 88,660 मते मिळाली. यातून विनय कुलकर्णी या जिल्ह्याबाहेर राहून विजयी झाले आहेत.

त्यांच्या पत्नी आणि मुलांसह मोठ्या समर्थकांनी विनयचा प्रचार केला होता

Tags: