माझ्यावर विश्वास ठेवून, प्रेम देऊन मला निवडून देणाऱ्या जनतेची मी आभारी आहे. आता निपाणी मतदारसंघात विकासाला प्राधान्य देणार आहे अशी प्रतिक्रिया आ. शशिकला जोल्ले यांनी विजयानंतर दिली.

बेळगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. शशिकला जोल्ले म्हणाल्या की, निपाणी मतदारसंघाच्या विकासाची जास्त जबाबदारी माझ्यावर आली आहे. गेल्या पाच वर्षांप्रमाणेच आताही मतदार संघाचा विकास साधण्यावर भर देणार आहे. जनतेने मला प्रेमाने, विश्वासाने निवडून देऊन हॅट्ट्रिक केली आहे. पक्षाचे ब्लॉक अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी माझ्या विजयासाठी परिश्रम घेतले आहेत. त्या सर्वांची मी आभारी आहे असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, त्यांच्यासोबत आलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी ‘जोल्ले वहिनींचा विजय असो, भारतीय जनता पक्षाचा विजय असो अशा घोषणा दिल्या.


Recent Comments