election

बंडल आमदारांचे बंडल जनतेने परत पाठवले : महेंद्र तम्मण्णावर

Share

कुडचीच्या बंडल आमदारांचे बंडल जनतेने परत पाठवले आहे. आता मतदारसंघात आरोग्य आणि शिक्षणाला प्राधान्य देऊन काम करणार आहे अशी प्रतिक्रिया कुडचीचे विजयी काँग्रेस उमेदवार महेंद्र तम्मण्णावर यांनी व्यक्त केली.

विजयी झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना महेंद्र तम्मण्णावर म्हणाले की, राज्यातील जनतेला बदल हवा होता. 40% कमिशनचे भ्रष्ट सरकार, वाढती महागाई, जाती-धर्मात भांडणे याला जनता कंटाळली होती. त्यामुळेच राज्यातील जनतेने काँग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे. पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीला भाजपने ग्राम पंचायत इतक्या खालच्या पातळीवर प्रचाराला आणले. जनतेच्या हे लक्षात आले. कुडची मतदार संघातील जनतेलाही बदल हवा होता. गेल्या दहा वर्षातील बंडल आमदारांच्या बंडल कारभाराला जनता कंटाळली होती. त्यामुळे यावेळी त्यांचे बंडल जनतेने परत पाठवले आणि मला 27 हजारांच्या मताधिक्क्याने निवडून आणले आहे. आता मतदारसंघात आरोग्य आणि शिक्षणाला प्राधान्य देण्यास मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार आहे असे त्यांनी सांगितले.

एकंदर बंडल आमदारांचे बंडल जनतेने परत पाठवले असे सांगत कुडचीचे नवनिर्वाचित आमदार महेंद्र तम्मण्णावर यांनी भाजप आमदार पी. राजीव यांच्यावर शरसंधान केले.

Tags: