Bailahongala

जनतेचा चिरऋणी; अधिक सुविधा मिळवून देणार : महांतेश कौजलगी

Share

बेलहोंगल मतदार संघातील जनतेने माझ्या वडिलांना आणि आता मला निवडून दिले आहे. त्यांचा मी चिरऋणी आहे. जनतेला अधिकाधिक सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे बैलहोंगल मतदारसंघातील काँग्रेसचे विजयी उमेदवार आ. महांतेश कौजलगी यांनी सांगितले.

विजयी झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. महांतेश कौजलगी म्हणाले की, बैलहोंगल मतदारसंघातील जनतेने नेहमीच कौजलगी कुटुंबावर प्रेम केले आहे. यापूर्वी माझ्या वडिलांना आणि तीनवेळा मला निवडून दिले आहे. त्यांचा मी ऋणी राहीन, आता सरकारी योजनांचा लाभ आणि अधिकाधिक सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे ते म्हणाले.

Tags: