ही निवडणूक जिंकल्यानंतर माझी जबाबदारी वाढली आहे, माझ्याविरोधात बोलणाऱ्यांना जनतेनेच उत्तर दिले आहे अशी प्रतिक्रिया आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.

मतमोजणीनंतर बेळगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी आपल्याला जास्त मते मिळाल्याने आपला आत्मविश्वास वाढला आहे. मतदारसंघातील कार्यकर्ते व ज्येष्ठांनी प्राथमिक तयारी करून माझ्या विजयासाठी परिश्रम घेतले.
टप्प्याटप्प्याने जनतेच्या हृदयाला स्पर्श करण्याचे काम आम्ही केले असून जनतेचे प्रेम व विश्वासामुळे या टप्प्यावर पोहोचली आहे.
तुम्हाला विरोध करणार्यांबद्दल काय सांगाल?, असा प्रश्न त्यांना प्रसारमाध्यमांनी विचारला असता म्हणाल्या की, ही निवडणूक जिंकून मी त्यांना उत्तर दिले आहे. आता पक्ष हायकमांड देईल ती जबाबदारी मी पार पाडेन.
बेळगाव ग्रामीणचा गड राखण्यात यशस्वी झालेल्या लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या चेहऱ्यावर आनंद यावेळी ओसंडून वाहत होता.


Recent Comments