बेळगाव जिल्ह्यातील १८ मतदारसंघांपैकी ११ मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत . तर सात मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत .

बेळगाव जिल्ह्यात विधानसभेच्या १८ मतदारसंघापैकी बेळगाव ग्रामीण मतदार संघात काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर यांनी १०७६१९ मते मिळवून विजय प्रस्थापित केला . तर बेळगाव उत्तर मतदार संघात आसिफ उर्फ राजू सेठ यांनी , भाजपचे डॉ रवी पाटील यांचा पराभव केला . आसिफ सेठ याना ५५९३९ मते मिळालीत आणि त्यांनी ४२२० मतांनी विजय मिळवला . तर बेळगाव दक्षिणमध्ये भाजपचे अभय पाटील यांनी ७७०९४ मते मिळवली आणि विजयी झाले . तर खानापूर मध्ये भाजपचे विठ्ठल हलगेकर विजयी झाले .
चिकोडी सदलगा मतदारसंघातून , काँग्रेसचे राजू कागे ८३३८७ मते मिळवून विजयी झाले तर कित्तूर मध्ये काँग्रेसचे बाबासाहेब पाटील यांनी ७७५३६ मते मिळवून विजय संपादन केला . कुडची मतदार संघातून काँग्रेसचे महेंद्र तम्मण्णावर ८५३२१ मते मिळवून विजयी झाले .
यमकनमर्डी मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार , सतीश जारकीहोळी हे १ लाख २९० मताधिक्याने विजयी झाले . तर गोकाक मधून भाजपचे उमेदवार रमेश जारकीहोळी यांनी विजय मिळवला . अरभावीमध्ये भाजपचे उमेदवार भालचंद्र जारकीहोळी यांनी २८४३१ मतांनी विजय मिळवला . तर अथणीचे काँगेसचे उमेदवार लक्ष्मण सवदी यांनी १३१४०४ मताधिक्याने विजय मिळवला .
बैलहोंगल मतदारसंघात काँग्रेसचे महांतेश कौजलगी यांनी ५७७८३ मताधिक्याने विजय मिळवला .
निप्पाणी मतदारसंघात भाजपच्या शशिकला जोल्ले यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला . त्यांना
७३६२५ मते मिळाली . तर रायबागमध्ये दूर्योधन ऐहोळे ५७५०० मतांनी विजयी झाले .
हुक्केरी मतदारसंघात भाजपचे निखिल कत्ती १३५००० मते मिळवून भरघोस मतांनी निवडून आले .तर
सौंदत्ती यल्लम्मा मतदारसंघात विश्वास वैद्य हे काँग्रेसचे उमेदवार ७१२२४ मते मिळवून विजयी झाले .
एकंदर बेळगाव जिल्ह्यात काँग्रेसला मतदारांचा पाठिंबा मिळाला आहे . राज्यात देखील काँग्रेसने , जादुई आकडा पार केला असून ,काँग्रेसला स्पष्ट बहुमताचे सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली आहे .


Recent Comments