अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सीमाभागामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीची पूर्णपणे निराशा झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये एकही समितीचा एकही उमेदवार आघाडीवर आलेला नाही, तर बेळगाव जिल्ह्यातील 18 मधील 13 मतदारसंघावर काँग्रेस उमेदवार आघाडीवर आहेत.

सर्वाधिक लक्ष लागून राहिलेल्या निपाणी मतदारसंघांमध्ये भाजपच्या उमेदवार शशिकला जोल्ले सध्या आघाडीवर आहेत. त्यामुळे एकंदरीतच बेळगावमध्ये काँग्रेसचा वरचष्मा दिसून येत आहे. अथणीमधून लक्ष्मण सवदी आघाडीवर आहेत. दरम्यान, बेळगाव जिल्ह्यामध्ये निवडणुकीसाठी अत्यंत कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून मिरवणुका, सभा घेण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्याच बरोबर दहा हजारांहून अधिक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये जवळ 18 जागांसाठी 187 उमेदवार रिंगणात आहेत.
मतमोजणीसाठी एकूण 1128 कर्मचारी तर बंदोबस्तासाठी 1500 सुरक्षाकर्मी तैनात करण्यात आले आहेत.
अत्यंत चुरशीने होत असलेल्या कर्नाटक निवडणुकीमध्ये काँग्रेसने बहुमताकडे वाटचाल सुरु केली आहे. मतमोजणीच्या पहिल्या दीड तासांच्या कलांमध्ये काँग्रेसने 131 जागांवर आघाडी मिळवली आहे, तर प्रतिस्पर्धी भाजपने 73 जागांवर आघाडी मिळाली आहे. कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये किंगमेकर ठरतील असे गेल्या काही दिवसांपासून बोललं जात असलेल्या जेडीएसला 18 जागांवर आघाडीवर आघाडीवर आहे. एकंदरीत कर्नाटकचा निकाल एक्झिट पोलनुसार हा काँग्रेसच्या बाजूने जातो का? याचे उत्तर दुपारपर्यंत मिळेल.


Recent Comments