Belagavi

काँग्रेसने भाजपकडून हिसकावला बेळगावचा गड

Share

कर्नाटक विधानसभेसाठी बेळगाव जिल्ह्यातील सर्व 18 मतदार संघांचे निकाल व कल हाती आले असून काँग्रेसने बेळगाव जिल्ह्याचा गड भाजपकडून हिसकावला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बेळगावात लोकसभा मतदार संघातील 10 विधानसभा मतदार संघांचे निकाल पुढीलप्रमाणे :
1. बेळगाव ग्रामीणमध्ये काँग्रेसच्या उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांचा विजय
2. बेळगाव दक्षिणमध्ये भाजपचे उमेदवार अभय पाटील विजयी
3. खानापूरमध्ये भाजपचे उमेदवार विठ्ठल हालगेकर यांचा विजय
4. गोकाकमध्ये भाजपचे उमेदवार रमेश जारकीहोळी विजयी
5. बैलहोंगलमध्ये काँग्रेसचे उमेदवार महांतेश कौजलगी विजयी
6. कित्तूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार बाबासाहेब पाटील विजयी
7. सौंदत्तीमध्ये काँग्रेसचे उमेदवार विश्वास वैद्य विजयी
8. रामदुर्गमध्ये काँग्रेसचे उमेदवार अशोक पट्टण विजयी
9. अरभावी मतदारसंघात भाजपचे भालचंद्र जारकीहोळी यांचा विजय
10. बेळगाव उत्तर मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजपमध्ये कांटे की टक्कर सुरु असून काँग्रेस आघाडीवर आहे.
चिक्कोडी लोकसभेतील 8 पैकी 5 मतदारसंघात कॉंग्रेसचा विजय झाला आहे.
1. अथणी मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार लक्ष्मण सवदी विजयी
2. कागवाडमध्ये काँग्रेसचे उमेदवार राजू कागे विजयी
3. कुडचीमध्ये काँग्रेसचे महेंद्र तम्मनवर यांचा विजय
4. चिक्कोडी मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार गणेश हुक्केरी विजयी
5. निप्पाणी मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार शशिकला जोल्ले विजयी
6. यमकनमर्डीमध्ये काँग्रेसचे सतीश जारकीहोळी विजयी
7. हुक्केरी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार निखिल कत्ती विजयी
8. रायबाग मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत सुरु आहे.

Tags: