मागील वेळेस आमच्याच काही चुकांमुळे कित्तूर हातून गेले होते. पण आता प्रयत्नपूर्वक काँग्रेसचा हा बालेकिल्ला आम्ही परत मिळवलाय. आता जनतेच्या विश्वासाला पात्र राहून काम करू अशी प्रतिक्रिया कित्तूर मतदार संघातील काँग्रेसचे विजयी उमेदवार बाबासाहेब पाटील यांनी दिली.

विजयी घोषित झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बाबासाहेब पाटील म्हणाले की, कित्तूर मतदारसंघात चुरशीची लढत झाली. पण आम्हाला अपेक्षित मते मिळाली आहेत. आमचे लक्ष्य पूर्ण झाले आहे. कित्तुरूचा गड परत मिळवण्यात आम्ही यश मिळवले आहे. आता जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले.


Recent Comments