संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या हाय व्होल्टेज अथणी मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार लक्ष्मण सवदी यांचा दणदणीत विजय निश्चित झाला आहे.

मतमोजणीच्या 18 फेऱ्या पूर्ण झाल्या असून, त्यात लक्ष्मण सवदी 59 हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यांचा
विजय निश्चित झाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी अथणीत एकच जल्लोष केला. आपले प्रतिस्पर्धी महेश कुमठळ्ळी यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या लक्ष्मण सवदी यांनी भाजप हायकमांडला झुगारून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या निर्णयाने भाजपला मोठा धक्का बसला होता. त्यामुळे भाजपनेही या मतदार संघातील लढत प्रतिष्ठेची मानून तिथे चांगलाच जोर लावला होता. त्यामुळे या मतदार संघातील लढत हायव्होल्टेज ठरली होती. त्यात सवदी यांनी बाजी मारून पुन्हा एकदा अथणीचा आपला बालेकिल्ला अभेद्य राखला आहे.


Recent Comments