भाजपच्या गैरकारभाराला कंटाळलेल्या जनतेने यावेळी काँग्रेसला साथ दिली आहे, त्यामुळे काँग्रेस बहुमताने सत्तेची सूत्रे हाती घेणार असल्याचे केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.

बेळगाव येथील जिल्हा काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सतीश जारकीहोळी म्हणाले की, प्रत्येक वेळी कमळाचे ऑपरेशन होत नाही, तर काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळेल, उद्याच्या निकालाची वाट पहा. म. ए. समितीबद्दल बोलताना समितीचा पुनर्जन्म अभय पाटील यांच्यामुळे झाला आहे, त्यांच्यामुळेच समिती या पातळीपर्यंत पोहोचली आहे असे ते म्हणाले.
सत्तेचा दुरुपयोग आणि पोलिसांच्या अपयशाला जनता कंटाळली आहे, त्यामुळे लोक काँग्रेसकडे झुकत आहेत. काँग्रेसची सत्ता आल्यावर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्व गॅरंटीची अंमलबजावणी केली जाईल, असे ते म्हणाले. सर्वत्र झालेल्या मतदानाचा कल पाहता, काँग्रेस 120 जागा जिंकणार असून बेळगाव जिल्ह्यात 10 जागा जिंकण्यात यश मिळवणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसने याबाबत कोणताही निर्णय घेतला नसून निकालानंतर चर्चा करूनच याबद्दल सांगण्यात येईल.
एकंदर, राज्यात यावेळी काँग्रेस पूर्ण बहुमताने सत्तेत येईल असा विश्वास सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केलाय.


Recent Comments