Chikkodi

मंत्री शशिकला जोल्ले दिसल्या रिलॅक्स मूडमध्ये !

Share

निपाणी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार शशिकला जोल्ले निवडणुकीनंतर गुरुवारी सकाळपासून रिलॅक्स मूडमध्ये दिसून आल्या. घरातील पाळीव प्राण्यांसोबत त्यांनी काही वेळ घालवला.

जवळपास महिनाभरापासून निवडणूक प्रचारात व्यस्त असलेले नेते आता निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. निप्पाणी मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार शशिकला जोल्ले, बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील एकसंबा शहराच्या रहिवासी आहेत. त्यांच्या राहत्या घरी त्यांनी सकाळी घरी आराम केला. नंतर गाय आणि बागेतील विविध झाडात निवांत मूडमध्ये रमताना दिसल्या.

प्रसारमाध्यमांशी बोलताना निप्पाणीच्या आमदार शशिकला जोल्ले म्हणाल्या की, मोदींचे यश आणि देशभरातील मतदारांची भाजप पक्षाला असलेली पसंती लक्षात घेता या निवडणुकीत भाजपचीच सत्ता येणार आहे. निपाणी मतदारसंघातील मतदारांनी मी मतदारसंघात केलेल्या विकासाभिमुख कामाचे कौतुक करून मला पाठिंबा दिला. यावेळी विजयाची हॅटट्रिक निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त करून कमळ फुलण्याची खात्री असल्याचे सांगितले.


निवडून आल्यानंतर मतदारसंघातील विकासकामे करून आदर्श मतदारसंघ बनविण्याचे आपले ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले

Tags: