विजापूर जिल्ह्यातील बसवनबागेवाडी तालुक्यातील मसबिनाळ गावात ग्रामस्थांनी मतदान यंत्रे फोडल्याची घटना घडली. ग्रामस्थांनी आरक्षित ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपीएटी मशीन फोडून संताप व्यक्त केला. बिसनाळ , डोनुर गावातून मशिन्स विजापूर येथे परत आणल्या जात असताना ही घटना घडली.
चुकीने मतदान प्रक्रिया अर्ध्यावरच थांबवली गेली आणि परत घेण्यात आली, असे समजून गावकऱ्यांनी मतदान यंत्र फोडले आणि आपला राग काढला. शिवाय अधिकाऱ्यांच्या गाडीचेही नुकसान झाले. कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्यात आली. मसबिनाळ गावात गोंधळाचे वातावरण आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मशीन्स मतदान यंत्रांच्या बाबतीत वापरण्यासाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. ती परत आणल्याचे लक्षात आल्यानंतर लोकांनी कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. यावेळी कर्मचाऱ्यांनी नीट उत्तर न दिल्याने गावकर्यांनी ईव्हीएम आणि व्हीव्ही पॅट मशिन्स रस्त्यात फोडली .
जिल्हाधिकारी विजयकुमार दानम्मनवर आणि एसपी आनंदकुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. आणि घटनेची माहिती घेतली आहे. गाडीत अतिरिक्त ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मशीन आणण्यात आल्या होत्या. चुकीची माहिती दिल्याने मसबिनाळ गावातील लोकांनी निवडणूक कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मशीनची मोडतोड करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांनी वापरलेली कार पलटी होऊन तिचे नुकसान झाले. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले कि ,या घटनेच्या संदर्भात गोंधळ घालणाऱ्या काही लोकांना आधीच अटक करण्यात आली आहे. हे बेकायदेशीर काम आहे. जो कोणी चूक असेल त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. या घटनेत सहभागी असलेल्या 20 ते 25 जणांना ताब्यात घेण्यात आले. एसपी आनंद कुमार यांनी असा इशारा दिला आहे की अशा घटनांमध्ये कोणीही सहभागी असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
सध्या मसबिनाळ गावातील परिस्थिती नियंत्रणाखाली आहे.
Recent Comments