निप्पाणी मदारसंघाच्या भाजपाच्या उमेदवार , धर्मादाय, हज आणि वक्फ मंत्री शशिकला जोल्ले यांनी आपल्या कुटुंबियांसोबत मतदान केंद्रावर जाऊन संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क बजावला .

धर्मादाय हज आणि वक्फ मंत्री शशिकला जोल्ले तसेच त्यांचे पती , चिक्कोडी लोकसभा खासदार अण्णासाहेब जोल्ले , मुले ज्योतिप्रसाद जोल्ले, प्रिया जोल्ले आणि बसवप्रसाद जोल्ले यांनी एकसंबा शहरातील शासकीय उच्च प्राथमिक मुलींची शाळा एकसंबा येथील , बुथ क्रमांक 27 येथे जाऊन मतदान केले.
यावेळी त्यांनी सर्वानी न चुकता आपले अमूल्य मतदान करावे असे आवाहन मतदारांना केले .


Recent Comments