election

नंदगडमध्ये ईव्हीएम रुसले; अर्धा तास मतदान ठप्प झाल्याने मतदारांचा खोळंबा

Share

नंदगड गावातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये मतदान यंत्रात बिघाड झाल्याने अर्धा तास मतदान ठप्प झाल्याने मतदारांची पळापळ झाली.

खानापूर तालुक्यातील नंदगड गावातील प्रभाग क्रमांक 1 मधील मतदान केंद्रात मतदान यंत्रात बिघाड झाल्याने गोंधळ उडाला. यामुळे मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांनी अर्धा तास गोंधळ घातला होता.

 

याबाबत अधिका-यांना विचारणा केली असता, ते पाहू, मतदान यंत्र दुरुस्त करू, अशी उडवाउडवीची उत्तरे देत होते. मतदारांनी त्यांना याबाबत जाब विचारला. दरम्यान, याची माहिती मिळताच काँग्रेसच्या उमेदवार आ. अंजली निंबाळकर यांनी या मतदान केंद्रात येऊन मतदान यंत्र त्वरित दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या. एकूण काय तर मतदार यामुळे कंटाळलेले दिसून आले.

Tags: