election

आ . श्रीमंत पाटील यांनी कुटुंबियांसह केले मतदान

Share

कागवाड विधानसभा मतदारसंघातील केंपवाड, कागवाड, उगार, शेडबाळ, ऐनापुरे सर्वच मतदान केंद्रांवर सकाळपासूनच तरुण-तरुणी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी होत आहेत. अनेक मतदारांनी माझ्या बाजूने कौल दिल्याने तिसऱ्यांदा आमदार म्हणून विजयाची हॅट्ट्रिक करणार असल्याचे आमदार श्रीमंत पाटील यांनी सांगितले.

 

आमदारांची आई पार्वतीबाई, पत्नी उज्वलाताई पाटील, मुले श्रीनिवास, सुशांत, योगेश, भाऊ उत्तम पाटील आणि सून यांच्यासमवेत बुधवारी सकाळी केंपवाड गावातील बूथ क्रमांक ८८ वर मतदान केल्यानंतर ते बोलत होते.

माझ्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग , रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा, माजी मंत्री रमेश जारकीहोळी, भालचंद्र जारकीहोळी यांनी एकत्र येऊन प्रचार केला.

क्षेत्राच्या विकासासाठी मी सुमारे 3 हजार कोटींचे अनुदान आणून विविध विकासकामे केली आहेत. हेच माझ्या विजयासाठी पूरक ठरेल . मला सर्वत्र व्यापक पाठिंबा दर्शविला जात आहे, माझा विजय निश्चित आहे. असे ते म्हणले .

 

Tags: