Belagavi

बेळगाव दक्षिणमध्ये यावेळी होणार बदल : प्रभावती मास्तमर्डी यांचा दावा

Share

बेळगाव दक्षिण मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार प्रभावती मास्तमर्डी यांनी आज वडगावमधील मतदान केंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी दक्षिणमध्ये निश्चित बदल दिसून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मतदानाचा हक्क बजावल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रभावती मास्तमर्डी म्हणाल्या की, दक्षिणमधील मतदार सकाळपासूनच लवकर मतदानाला बाहेर पडत आहेत. लोक यावेळी दक्षिणमध्ये निश्चित बदल घडविणार आहेत असा दावा त्यांनी केला.

 

मतदान हा घटनेने दिलेला मूलभूत अधिकार आहे. मतदारांनी कसल्याही प्रकारच्या आमिषांना बळी न पडता मुक्त वातावरणात मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले. वडगाव परिसरातील मतदान केंद्रांवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मोबाईल बाळगण्याची मुभा देण्यात आली आहे. हे कायद्यांचे सरळसरळ उल्लंघन असल्याचा आरोप काँग्रेस उमेदवार प्रभावती मास्तमर्डी यांनी केला.

Tags: