Belagavi

चिक्कोडी चेकपोस्टवर 15 लाख रुपये जप्त

Share

निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मोठे घबाड जप्त करण्यात निवडणूक अधिकाऱ्यांना यश आले आहे.

महाराष्ट्रातून चिक्कोडी तालुक्यातील मांजरी येथे जाणाऱ्या एका व्यक्तीला चिक्कोडी चेकपोस्टवर अडवून त्याची झडती घेण्यात आली.

 

त्यावेळी त्याच्याकडील प्लास्टिक पोत्यात 15 लाख रुपये आढळून आले. ते निवडणूक अधिकाऱ्यांनी जप्त केले.

 

याबाबत प्राप्तिकर खात्याला माहिती देण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीवर कर्नाटक पोलीस कायद्याच्या कलम 98नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: