अंकलगी येथील मोहम्मद देसाई या विद्यार्थ्याने ९८% गुण मिळवून तर पूजा दुडगुंटी हिने एसएसएलसी परीक्षेत ९२% गुण मिळवून अंकलगी शहराचा गौरव वाढविला आहे.

अंकलगी विद्यारण्य प्राथमिक आणि माध्यमिक कन्नड शाळेची विद्यार्थिनी पूजा राजू दुडगुंटी हिला काल जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात ९२% गुण मिळाले आहेत. याच शाळेच्या मोहम्मद देसाई या विद्यार्थ्याने ९८% गुण मिळवून शाळेचा व गावाचा गौरव वाढवला आहे.
वरिष्ठ केएएस अधिकारी अशोक दुडगुंटी, परशुराम दुडगुंटी, पालक राजू आणि महादेवी दुडगुंटी, विद्यारण्य शाळेचे व्यवस्थापन मंडळ, मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक, वर्गमित्र आणि ग्रामस्थांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.
Recent Comments